पॉवरलिफ्टर सुरज देवकुळेची नोकरीसाठी वणवण

  मुंबई  -  

  भोईवाडा - सूरज देवकुळे... एकेकाळी त्यानं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध पदकं जिंकली आहेत. पण हा पॉवरलिफ्टर आज मात्र हलाखीचं जीवन जगतोय. भोईवाड्याच्या बीडीडी चाळीतल्या 12 बाय 10च्या खोलीत आईसह कसाबसा उदरनिर्वाह करतोय. वणवण करूनही सूरजला कुठे काम मिळेना म्हणून अखेर तो एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक झालाय. 

  बेस्टमध्ये काम करणाऱ्या सूरजच्या वडिलांचं निधन झालं. आईनं शिवणकाम करून घर चालवलं. सूरजच्या पॉवरलिफ्टिंगचा खर्च उचलण्यासाठी या माऊलीनं केलेली धडपड शब्दांत सांगताच येणार नाही. आर्थिक अडचणीमुळे सूरजला आशियाई स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. खर्च परवडत नसल्यानं त्याचा पॉवरलिफ्टिंगचा सरावही बंद झालाय. सरकारी मदत किंवा एखादा प्रायोजक मिळाला तरच अंधारलेल्या सूरजच्या आयुष्यात आशेचा किरण उजाडेल... आणि त्याच्या आई-वडिलांचं स्वप्नही साकार होईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.