ज्यूनिअर राष्ट्रीय फुटबॉलसाठी मुंबईचा गॅस्टन डिसिल्व्हा महाराष्ट्राचा कर्णधार


SHARE

कटक उडिशामध्ये होणाऱ्या 51 व्या ज्यूनिअर नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या गॅस्टन डिसिल्व्हा याची महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. या स्पर्धेत लक्षद्विप,सिक्कीम आणि त्रिपुरा हे संघ देखील सहभागी होणार आहेत.
सोमवारी होणाऱ्या सामन्यानंतर बुधवारी 26 एप्रिलला महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा असा सामना रंगणार आहे. 28 एप्रिलला लक्षद्विप आणि 30 एप्रिलला सिक्कीमसोबत सामना आहे.  या संघाचे प्रमुख कोच सचिन बधाडे तर मोहम्मद अन्सारी हे संघाचे मॅनेजर आहेत.

संघ - आर्चिस कोवली, जहान वालिया, मार्क डिसोझा, मोहम्मद कमरान अन्सारी, मोहम्मद झाईद, निखिल प्रभू, गॅस्टन डिसिल्व्हा (कर्णधार-मुंबई), ऑलफ्रेड नेगाल, दीपानकुर शिंदे, रोमारियो नझारेथ, संतोष राठोड, तिमोती कॅमे, आशिष अवती, मोहम्मद मुस्तेजब अश्रफ, यश शुक्ला, फरदीन खान, सौरभ रामटेके, संकेत साळोखे, श्रीराम शिवकुमार अय्यर, आणि भुवनेश शेंद्रे

सामने
सोमवार 24 एप्रिल - हिमाचल प्रदेश विरूद्ध महाराष्ट्र
बुधवार 26 एप्रिल - महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा
शुक्रवार 28 एप्रिल - महाराष्ट्र विरूद्ध लक्षद्विप
रविवार 30 एप्रिल - महाराष्ट्र विरूद्ध सिक्कीम

संबंधित विषय
ताज्या बातम्या