SHARE

तिसऱ्या फाईव्ह डिस्ट्रीक्ट ओपन ट्रॅक-फिल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे सेंच्युरी रेयनचा सशी दिवाडकर आणि ठाण्याच्या सेव्हन स्टार स्पोर्ट्स अकादमीच्या अक्षया जद्यार या दोघांनी 5000 मीटर धावण्यात सुवर्ण पदक मिळवत शानदार कामगिरी केली. इंडियन मास्टर अॅथलेटिक्सतर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा चर्नीरोड येथील युनिव्हर्सिटी मैदानावर खेळवण्यात आली. या अॅथलेटिक्स स्पर्धेत सशीने 12:57:44 सेंकदात सुवर्ण पदकावर कब्जा केला. तर विवेक कर्मा याने दुसरा क्रमांक पटकावला.


मुलींच्या गटात अक्षया प्रथम

महिलांच्या गटात ठाण्याच्या अक्षयाने 21:12:99 सेकंदात 5000 मीटरचा पल्ला पार गाठत पहिले स्थान मिळवले. 18 वर्षाखालील मुलींच्या गटात 400 मीटर प्रकारात ठाण्याच्या होली क्रॉस शाळेच्या पूर्वा शिंदे हिने सुवर्णपदक पटकावले. 20 वर्षांखालील गटात जीपीएम महाविद्यालयाच्या रावल धर्मा याने सुवर्ण पदक मिळवले.

18 वर्षाखालील मुलींच्या गटात उंच उडी प्रकारात उदयांचल महाविद्यालयाच्या शर्वरी परुळेकर हिने सुवर्ण पदकाची कमाई केली.


संबंधित विषय
ताज्या बातम्या