मुंबईला हरवत गुजरातचा ऐतिहासिक विजय

 Pali Hill
मुंबईला हरवत गुजरातचा ऐतिहासिक विजय
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - रणजी चषकावर तब्बल 45 वेळा नाव कोरणाऱ्या मुंबईला पार्थिव पटेलच्या गुजरात संघाने 5 विकेट्सनी धूळ चारली. रणजीमध्ये धडाकेबाज कामगिरी करून गुजरातला फायनलपर्यंत पोहोचवणारा कर्णधार पार्थिव पटेल सामन्याचा हिरो ठरला. पटेलने 193 चेंडूत 143 धावा करत गुजरातला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने 24 चौकार ठोकलेत. पार्थिवनं मनप्रीत जुनेजाच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 116 धावांची आणि रुजुल भटच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचून गुजरातला विजयाच्या जवळ नेलं. मनप्रीत जुनेजानं 54 धावांची, तर रुजुल भटनं नाबाद 27 धावांची खेळी करून गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Loading Comments