Advertisement

गल्फ मान्सून स्कूटर स्पर्धा 2 जुलैपासून


गल्फ मान्सून स्कूटर स्पर्धा 2 जुलैपासून
SHARES

लिमका बुकमध्ये नोंद असलेल्या 28 व्या गल्फ मान्सून स्कूटर स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे 28 वे वर्ष आहे.  ही स्पर्धा 2 जुलै रोजी नवी मुंबई येथे होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी स्पर्धेत गतविजेता सय्यद असिफ अली (भोपाळ) आणि उपविजेता शमीम खान (नासिक) यांचाही समावेश असेल.

भारतीय बनावटीच्या सर्व्ह टू स्ट्रोक आणि गिअर नसलेल्या स्कूटर्ससाठी ही स्पर्धा खुली राहणार आहे. ही स्पर्धा 80 सीसी ते 110 सीसी फोर स्ट्रोक आणि 130 सीसी ते 160 सीसी अशा गटांत विभागली आहे. स्पर्धेतल्या विजेत्यांना करंडकासह पारितोषिक देखील दिले जाणार आहे. पारितोषिकांची एकूण रक्कम 1 लाख 40 हजार असणार आहे, तर प्रथम येणाऱ्यास 22 हजारांची रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येईल.

22 जून रोजी संध्याकाळी 5 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. त्यानंतर 27 जून दुपारी 1 पर्यंत विलंब शुल्कासह प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, भोपाळ, जोधपूर आणि डेहराडून येथील स्पर्धकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. एकूण 50 प्रवेशिकांचा यात समावेश असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वाहनांची तपासणी ही 1 जुलै रोजी परळ येथील अवर लेडी स्कूल येथे होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement