दीपा आशियाई चॅम्पियनशिपची संधी हुकणार

 Mumbai
दीपा आशियाई चॅम्पियनशिपची संधी हुकणार

भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तिला पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता येणार नाही. मुंबईतल्या डॉ. अनंत जोशी या रुग्णालयात दीपा करमाकरच्या गुडघ्यावर जी दुखापत झाली आहे त्याला एंटिरियर क्रुसियेट लिगामेंट म्हणतात. महिलांच्या शरीर रचनेनुसार पुरुषांपेक्षा महिलांना ही दुखापत जास्त होते.

एंटिरियर क्रुसियेट लिगामेंट हे गुडघ्यातील चार मुख्य अस्थिबंधनांपैकी एक आहे. या दुखापतीमुळे दीपाला पुढील दोन महिने सराव करता येणार नाही. तसेच 2020 मध्ये होणारे ऑलिम्पिक स्पर्धा दीपासाठी जास्त महत्त्वाची असणार आहे.

Loading Comments