Advertisement

टॅंकरचालकाच्या मुलाचा चिनी प्रतिस्पर्ध्याला दमदार ठोसा


टॅंकरचालकाच्या मुलाचा चिनी प्रतिस्पर्ध्याला दमदार ठोसा
SHARES

स्वत:च्या हाती भलेही गाडीचे स्टिअरिंग असले, तरी एका टँकरचालकाने आपल्या मुलाच्या हातात मोठ्या धाडसाने बॉक्सिंग ग्लोव्हज घातले. हे ग्लोव्हज घालून या मेहनती मुलाने बॉक्सिंगचे खडतर प्रशिक्षण तर घेतलेच, पण चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करून वडिलांच्या स्वप्नांनाही आकार दिला आहे.

अनुज कुमार असे या बॉक्सरचे नाव अाहे. 'वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशन'ने (WBO) २८ जुलै रोजी चीनच्या शांघाय शहरातील ओरिएंटल स्पोर्ट्स सेंटर येथे 'वर्ल्ड फ्लायवेट चॅम्पियनशीप' स्पर्धेचे आयोजन केले होते.



मजबूत ठोश्यांनी घायाळ

या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनुज कुमारने चीनच्या झुबीयो चेन सोबत झालेल्या लढतीत दमदार कामगिरी केली. ही लढत बरोबरीत सुटली असली, तरी अनुजच्या मजबूत ठोश्यांनी चाहत्यांसहित अनुभवी बॉक्सर्सनाही घायाळ केले.

या सामन्यात अनुभवी झुबीयो चेनला नवख्या अनुजने अत्यंत कडवी लढत दिली. त्याचा जोश, चपळ हालचाली आणि दमदार ठोसे पाहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले.


खडतर परिस्थितीवर मात

अनुज आपल्या कुटुंबासहित मानखुर्दच्या ज्योतीर्लिंग परिसरात राहतो. त्याचे वडील टँकर चालक असल्याने अत्यंत तुटपुंज्या कमाईत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलाला व्यावसायिक बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले.




अशी मिळाली प्रेरणा

प्रसिद्ध बॉक्सर अखिल कुमारला पाहून २००८ मध्ये अनुजला बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. स्थानिक स्पर्धा गाजवल्यानंतर अनुजने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवण्यास सुरूवात केली आहे.

अनुजने २०१५ ला थायलंड येथे झालेल्या प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याआधी त्याने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावत राहावा, अशीच त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे.




मी अगोदर तायक्वांडो शिकत होतो. पण माझे काही मित्र बॉक्सिंग शिकत असल्याने मी बॉक्सिंग खेळण्याचे ठरवले. सुरूवातीला बॉक्सिंगमुळे होणाऱ्या दुखापतींना पाहून खूप भिती वाटली होती. पण नंतर याच खेळात करिअर करण्याचे ठरवले. भारतात अजूनही बॉक्सिंगला म्हणावी तेवढी प्रतिष्ठा मिळालेली नाही. मलाही योग्य, चांगल्या आहारासाठी झगडावे लागत आहे. चीनच्या प्रतिस्पर्ध्यासोबत खेळताना माझ्यावर थोडे दडपण आले होते. त्याचा परिणाम माझ्या कामगिरीवर झाला. एक ना एक दिवस मी भारतासाठी नक्कीच सुवर्णपदक कमावेन.
- अनुज कुमार, बॉक्सर



हे देखील वाचा -

मुंबईकर आयुशीची गोल्डन किक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा