Advertisement

इंडियन अाॅईलचा बाॅम्बे गोल्ड कपवर कब्जा


इंडियन अाॅईलचा बाॅम्बे गोल्ड कपवर कब्जा
SHARES

तलविंदर सिंगच्या सुरेख कामगिरीमुळे दिल्लीच्या इंडियन अाॅईल संघाने भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेडचा (बीपीसीएल) सडन-डेथ पेनल्टी-शूटअाऊटमध्ये ५-४ असा पराभव करून ५२व्या बाॅम्बे गोल्ड कप अाॅल इंडिया हाॅकी स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. चर्चगेट येथील एमएचएएल महिंद्रा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्यानंतर पेनल्टी-शूटअाऊटमध्ये तलविंदरने एक अाणि सडन-डेथमध्ये अाणखी एक गोल करून इंडियन अाॅईलला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.


इंडियन अाॅईलला सुरुवातीलाच अाघाडी

इंडियन अाॅईलच्या अाघाडीवीरांनी सुरुवातीलाच अाक्रमक हल्ले चढवत बीपीसीएलचा गोलकीपर स्विंदर सिंग याच्यावर दबाव अाणला. चौथ्या मिनिटालाच स्विंदर सिंगच्या पायाला अादळून परत अालेल्या चेंडूवर तलविंदर सिंगने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली अाणि इंडियन अाॅईलला अाघाडी मिळवून दिली. मात्र बरोबरीसाठी बीपीसीएलला ५२व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. शेर सिंगने गोल करत सामना बरोबरीत साेडवला.


पेनल्टी-शूटअाऊटमध्येही बरोबरी

निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी-शूटअाऊटमध्येही दोन्ही संघाना पाच प्रयत्नांत फक्त तीन गोलच करता अाले. पेनल्टी-शूटअाऊटमध्ये इंडियन अाॅईलकडून भरत चिकारा, तलविंदर अाणि सिमरनजीत सिंग यांनी गोल केले तर ललित उपाध्याय, वरुण कुमार अाणि बिरेंदर लाकरा यांनी बीपीसीएलसाठी गोल केले. सडन-डेथमध्ये बीपीसीएलच्या भरत चिकाराचा प्रयत्न हुकला, त्यानंतर तलविंदरने अापला तिसरा गोल करत इंडियन अाॅईलच्या विजयावर मोहोर उमटवली.



हार्दिक सिंग ठरला सर्वोत्तम खेळाडू

बीपीसीएलच्या हार्दिक सिंग याने एसजेएएम सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. भारताचा युवा स्टार खेळाडू असलेल्या हार्दिकला १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात अाले. विजेत्या इंडियन अाॅईलने १.५ लाख रुपयांची तर उपविजेत्या बीपीसीएलने एक लाख रुपयांची कमाई केली.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा