Advertisement

मुंबईकर खेळाडूंची पिकलबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी


मुंबईकर खेळाडूंची पिकलबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी
SHARES

ऑल इंडिया पिकलबॉल अससोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या इंडियन ओपन पिकलबॉल स्पर्धेत भारताच्या अतुल एडवर्ड यांने आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक मिळवले आहे. ही स्पर्धा जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूल येथे खेळवण्यात आली. यावेळी झालेल्या महिला दुहेरीत सुपरात बाईब्डी - थिटीवोराडा नाकारावाँग या थायलंडच्या जोडीने सुवर्ण पदक मिळवत विजय मिळवला.


मुंबईकर खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत छाप

पुरुषांच्या दुहेरी फेरीतील अंतिम लढत ही भारतीयांमध्ये झाली. पण संभाव्य विजेते समजले जाणाऱ्या मनीष राव आणि भूषण पोतनीस या जोडीला रौप्य पदकावर समाधानी मानावे लागले. विशेष म्हणजे अतुल एडवर्ड, मनीष राव आणि भूषण पोतनीस या मुंबईकर खेळाडूंनी देखील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली छाप पाडली.

२०१३ सालापासून झालेल्या प्रत्येक राष्ट्रीय सामन्यात एकदाही पराभव न स्वीकारत निखिल सिंगने आपला दबदबा कायम राखला. त्याने प्रशांत तलानीसह खेळताना भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मनिष राव आणि भूषण पोतणीस या बलाढ्य जोडीचा ११-७, ५-११, ११-५ असा धुव्वा उडवत पराभव केला.


महिला गटात या जोडीचा विजय

महिला गटात सुप्ररात - थिटीवोरोडा या थायलंडच्या जोडीने विजय मिळवत यजमान संघाच्या करिष्मा - ॠतुजा या कालिके भगिनींचा ११-९, ११-८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर झेप घेतली. मिश्र गटात आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक मिळवत ब्रिटिशर इलायन शालक्रॉससह खेळताना सुवर्ण पदक पटकावले.

Read this story in English or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा