Advertisement

मला 'या' प्रकरणात अडकवलं - नरसिंह यादव


मला 'या' प्रकरणात अडकवलं - नरसिंह यादव
SHARES

'जे झाले त्यामुळे मी माझा सराव अजिबात बंद केलेला नाही. जे काही झाले त्याची सध्या चौकशी सुरू आहे. लवकरच अंतिम निकाल येईल. त्यानंतर पुन्हा मी माझ्या देशासाठी मैदानात उतरेन'...हे शब्द आहेत भारताचा कुस्तीपटू नरसिंह यादव याचे.

2015 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. त्याला भारताकडून 74 किलो वजनी गटातून प्रवेश मिळाला होता. पण लढतीच्या आधीच सराव करत असताना त्याच्यावर डोपिंगचा आरोप झाल्यामुळे क्रीडा लवादाने त्याच्या कुस्ती खेळण्यावर 4 वर्षांची बंदी घातली. त्यामुळे सध्या सीबीआयकडून या डोपिंगप्रकरणी चौकशी सुरू आहे.

पण नरसिंह म्हणतो, 'आपल्याला या डोपिंग प्रकणात गोवण्यात आले असून लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल आणि न्याय माझ्याच बाजूने लागेल असा मला विश्वास आहे. असे दुसऱ्या कोणत्याही खेळाडूसोबत होऊ नये. कारण खेळाडू मेहनत करून आपल्या देशासाठी खेळत असतो. त्याच्यावर झालेल्या आरोपामुळे देशाचीही बदनाही होऊ शकते. त्यामुळे जिथे स्पर्धा होतात, तिथे कोणाच्या खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अंमलीपदार्थ (ड्रग्ज) तर मिसळले जात नाही ना? याकडे सरकारनेही लक्ष देणे गरजेचे आहे. तिथे सुरक्षा वाढवणेही गरजेचे आहे'.

येत्या 15 सप्टेंबर रोजी मुंबईत संग्राम सिंग फाउंडेशनतर्फे पहिली खाशाबा जाधव मेमोरियल कुस्ती चॅम्पियनशिप ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. तेव्हा नरसिंह यादवही तिथे उपस्थित होता. त्यावेळी त्याने आपले मत व्यक्त केले.



'ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांनी कुस्तीमध्ये एक वेगळी छाप पाडली आहे, त्यांच्या नावाने कुस्तीची चॅम्पियनशिप होणार आहे. त्यात संग्राम सिंह खेळणार आहेत. त्यामुळे आपल्या देशात कुस्ती या खेळाचे महत्त्व आणखी वाढेल, ही खरंच चांगली गोष्ट आहे, अशा शब्दांत नरसिंहने आपल्या भावना व्यक्त केल्या.


लवकरच खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 15 सप्टेंबरला दिल्ली येथे होणार आहे. यामध्ये वर्ल्ड प्रो रेसलिंग आणि दोन वेळा कॉमनवेल्थ विजेता ठरलेल्या संग्राम सिंगची लढत अमेरिकेच्या स्पर्धकांसोबत होणार आहे. भारतातील पहिले ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यावेळी खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजीत जाधव, तसेच कुस्तीगीर नरसिंग यादव, अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंग देखील उपस्थित होते. खाशाबा जाधव यांच्या जीवनावर लवकरच चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याचे संग्रामने यावेळी सांगितले. तसेच ही स्पर्धा डिसेंबरमध्ये मुंबईत देखील होणार असल्याचे त्याने सांगितले. भारतातील तरुणांना संधी मिळावी तसेच त्यांचा सराव चांगला व्हावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


वडिलांच्या नावे कुस्ती संकुल बांधणार

खाशाबा जाधव हे रेसलिंगमधील एक हिरो म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहेत. ते पोलिस अधिकारी देखील होते. पण त्यांनी कधीच गर्व केला नाही. वडिलांच्या नावाने कुस्ती संकुल बांधणार, असे सरकारने सांगितले होते. पण फक्त घोषणा झाली, काम काहीच झाले नाही. म्हणून आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. पण त्यांनतर सरकारने मदत म्हणून पावणे पाच कोटी रुपये दिले आहेत, असे खाशाबा यांचे चिरंजीव रणजीत जाधव म्हणाले. 

लवकरच त्यांच्या नावाचे कुस्ती संकुल उभारले जाईल. भविष्यात या संकुलातून खेळाडू घडवले जातील. हे खेळाडू देशासाठी पदके जिकंतील. या संकुलातील खेळाडू ऑलिम्पिक विजेता नक्कीच होतील, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.

रणजीत जाधव, खाशाबा यांचे चिरंजीव



हेही वाचा - 

राज्य ग्रीकोरोमन कुस्तीत, पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद

क्रिकेट आणि कुस्तीनंतर आता आमिर खेळतोय टेबल टेनिस!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा