Advertisement

महाविद्यालयीन चेस, कॅरम स्पर्धेत १५२ विद्यार्थ्यांचा सहभाग


महाविद्यालयीन चेस, कॅरम स्पर्धेत १५२ विद्यार्थ्यांचा सहभाग
SHARES

जशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आतंरमहाविद्यालयीन कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत १५२ विद्यार्थी तसेच कॅरममध्ये ३९ संघांनी सहभाग घेतला होता. गोरेगाव येथील महाविद्यालयात ही स्पर्धा खेळवण्यात आली. यामध्ये विजयी स्पर्धकांना चषक देऊन गौरवण्यात आले.



बुद्धिबळ स्पर्धेत ठाकूर महाविद्यायाच्या संजीव मिश्रा याने प्रथम पारितोषिक मिळवले. तर के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या खिलीन सारा हिने द्वितीय क्रमांक मिळवला. कॅरम स्पर्धेत पहिला क्रमांक सेंट गोनसालो गरसिया महाविद्यालयाच्या अशुतोष गिरी याने पटकावला. अशुतोषने चारही सेटमध्ये आघाडी घेत बेडेकर महाविद्यालयाच्या निखीलला १८-१२ अशा फरकाने पराभूत करत विजेतेपद मिळवले. यामध्ये द्वितीय क्रमांक ठाण्याच्या एन. जी. बेडेकर महाविद्यालयाच्या निखील हंकारेने मिळवला.

महाविद्यालयीन पातळीवर ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. कॅरम डबलमध्ये प्रथम क्रमांक विरारच्या विवा महाविद्यालयाने पटकावला. तर अभिनव महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा