लोअर परळचा 'चाळकरी' बनला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू

  मुंबई  -  

  लोअर परळ - एखादी गोष्ट करायची तर तुम्हाला कोणतीच परिस्थिती अडवू शकत नाही आणि हेच खरं करून दाखवलंय बीडीडी चाळीत राहणाऱ्या ओमकार नेटकेने. मुुंबईसाराख्या शहरात नीट उभंही राहता येणार नाही एवढ्या छोट्याशा घरात राहणारा ओमकार आजघडीला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनलाय. त्याच्याकडे असलेल्या या ट्रॉफीज आणि मेडल त्याच्या या जिद्दीची साक्ष देतायत.

  छोट्याशा खोलीत राहणारा ओमकार कॉलेजसोबतच वडिलांना इस्त्रीच्या व्यवसायातही मदत करतो. सकाळी कॉलेज, रोज दोन तास कॅरमचा सराव आणि फावल्या वेळेत वडिलांना इस्त्री व्यवसायात मदत करणं हा ओमकारचा रोजचा दिनक्रम...मात्र या सर्वावर मात करून आज ओमकार राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय. तब्बल सहावेळा ओमकारने राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद पटकावलंय. तर, नुकतंच ओमकारने नेपाळमध्ये झालेल्या एशियन कॅरम स्पर्धेत भारताला गोल्ड मेडलची कमाई करून दिलीय.

  ओमकार मुंबईतील महर्षी विवेकानंद कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. सिनियर नॅशनल खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे. लहानपणापासूनच कॅरमची आवड असलेल्या ओमकारची आवड ओळखून संदीप सावला यांनी त्याला प्रशिक्षण दिलं आणि घडवला कॅरममधला एक हिरो..आयुष्यातला संघर्ष जिंकता जिंकता जग जिंकायला निघालेल्या या रिअल हिरोला मुंबई लाइव्हचा सलाम...

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.