Advertisement

राज्यात राजीव गांधींच्या नावे दिला जाणार ‘हा’ पुरस्कार

महाविकास आघाडी सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने एका पुरस्काराची घोषणा केली आहे.

राज्यात राजीव गांधींच्या नावे दिला जाणार ‘हा’ पुरस्कार
SHARES

देशातील क्रीडा क्षेत्रात मानाचा समजला जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. याआधी माजी पंतप्रधान दि. राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचं नाव बदलून ते मेजर ध्यानचंद असं करण्यात आलं आहे. ही बाब केंद्रात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे. या राजकीय वादात केंद्रावर कडी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने एका पुरस्काराची घोषणा केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजेच २० ऑगस्टला हा पुरस्कार देण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे.

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय ७ जुलै २०२१ रोजी काढला आहे. 

हेही वाचा- यंदा ११वी प्रवेशासाठीची स्पर्धा अधिक चुरशीची होणार

यासंदर्भात माहिती देताना, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या नावाने आगामी वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार स्वर्गीय श्री. राजीव जी यांच्या भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी कायमस्वरूपी आदरांजली असेल, असं ट्विट सतेज पाटील यांनी केलं आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेल रत्न पुरस्कार असावा अशा माझ्याकडे अनेक सूचना आल्या. त्यामुळे लोकांच्या भावनांचा विचार करून यापुढे खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हटलं जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच केली होती.

मोदींच्या या घोषणेनंतर त्यांनी खेळातही राजकारण आणल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- १०९ रेल्वे स्थानकांवर मिळणार ऑफलाईन लोकल पास


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा