Advertisement

मुंबई स्नूकर लीगमध्ये केजी, जेव्हीपीजीचा विजय


मुंबई स्नूकर लीगमध्ये केजी, जेव्हीपीजीचा विजय
SHARES

'बिलियर्ड आणि स्नूकर असोसिएशन, महाराष्ट्र'ने आयोजित केलेल्या 'ऑटर्स क्लब, मुंबई स्नूकर लीग'मध्ये खार जिमखानाच्या केजी वॉन्टेड आणि जुहू विलेपार्ले जिमखानाच्या क्यू मास्टर्स संघाने उप-उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवला. ही स्पर्धा ऑटर्स क्लब बिलियर्ड हॉल येथे झाली.

एकूण 32 फेरीमध्ये रंगलेल्या या सामन्यात सुरुवातीला 1-2 अशा फरकाने खार जिमखाना पिछाडीवर होता. पण साहिल कक्कड आणि कर्णधार हारमेहर मागो यांनी आक्रमक खेळ करत शेवटच्या दोन फेऱ्यात संघाला 3-2 अशा फरकाने विजय मिळवून दिला.



इतर सामन्यांत जुहू विलेपार्ले जिमखाना विरुध्द डोंबिवली जिमखाना यांच्यात झालेल्या सामन्यात जुहू विलेपार्ले संघाने 3-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवत डोंबिवली संघावर मात केली.

स्पर्धेत एकाच विभागातील दोन संघ आमने सामने होते. एक म्हणजे दादर पारसी कॉलनी जिमखाना, तर दुसरा दादर क्लब या दोन संघात झालेल्या सामन्यात हुशांग माझडायसाना आणि रॉनी दारुवाला या पारसी कॉलनी जिमखानाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत संघाला 3-1 असा विजय मिळवून दिला.



हे देखील वाचा -

शंभर नंबरी मॅरेथॉनपटू, १०० दिवसांत धावला १० हजार किमी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा