Advertisement

जीएमएएए जलतरण स्पर्धेत केनिषा, सुश्रूत ठरले सर्वोत्तम


जीएमएएए जलतरण स्पर्धेत केनिषा, सुश्रूत ठरले सर्वोत्तम
SHARES

अाॅटर्स क्लबची केनिषा गुप्ता अाणि ग्लेनमार्क अॅक्वेटिक फाऊंडेशनचा सुश्रूत कापसे यांनी जीएमएएए सिनियर अाणि ज्युनियर जलतरण स्पर्धेत अफलातून कामगिरी करत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. चेंबूर येथील टाटा स्विमिंग पूलवर पार पडलेल्या या स्पर्धेत केनिषाने पहिल्याच दिवशी तीन नव्या विक्रमांची नोंद करत तीन सुवर्णपदके पटकावली होती. महिलांच्या गटात तिने सर्वाधिक २८ गुणांची कमाई करत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्राप्त केला. पुरुष गटात सुश्रूतने चार नव्या विक्रमांची नोंद करत सर्वोत्तम खेळाडू होण्याचा मान पटकावला.


मुलींमध्ये ईस्थर, अनुषा सर्वोत्तम

मुलींच्या ८ वर्षांखालील गटात माटुंगा जिमखान्याच्या ईस्थर सिन्हा हिने एक सुवर्ण अाणि तीन रौप्यपदकांची कमाई केली. तिला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात अाले. जीएससीच्या टियारा सिंग हिने दुसरा क्रमांक पटकावला. ६ वर्षांखालील मुलींच्या गटात, सीएसएमएसएसच्या अनुषा गावकर हिने ४ सुवर्णपदकांची कमाई करत अव्वल स्थान प्राप्त केले. केअारसीच्या दित्या हमलाई हिला ३ रौप्यपदकांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


मुलांमध्ये फतेह, कबिर अव्वल

मुलांच्या ८ वर्षांखालील गटात जीएससीच्या फतेह सिंग याने ३ सुवर्ण अाणि १ कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे त्याने या गटात अव्वल खेळाडू होण्याचा मान पटकावला. एमएसपीचा विराज खरुडे २ रौप्यपदकासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलांच्या ६ वर्षांखालील गटात खार जिमखान्याच्या कबीर खुबचंदानी याने ४ सुवर्णपदके अाणि एका विक्रमासह सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्राप्त केला. माटुंगा जिमखान्याच्या धैर्य भूता याला ३ रौप्य अाणि १ कांस्यपदकासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.


हेही वाचा -

चार वर्षांनंतर कमबॅक करणे मुश्किल – सुशीलकुमार

टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा