निशा बैसमुळे एमपी संघाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

Mumbai
निशा बैसमुळे एमपी संघाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
निशा बैसमुळे एमपी संघाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
See all
मुंबई  -  

मुंबई - निशा बैसने एकापाठोपाठ केलेल्या 5 गोलमुळे मध्य प्रदेश महिला संघ सेमी फायनलमध्ये दाखल झाला. नॅशनल इंक्लूजन फुटबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन स्लमच्या वतीने करण्यात आलं. गुरुवारी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया आणि सीएसआर च्या वतीने गरीब आणि गरजू मुलांना मदतीसाठी हा खेळ खेळण्यात आला. एमपी संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती. पण, नंतर निशाने केलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळे एमपी संघाने आंध्रप्रदेशवर 6-3 अशी आघाडी घेत विजय निश्चित केला. सेमी फायनलमध्ये मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या दोन संघांनी जागा निश्चित केली आहे. तर, आसाम संघाला 6-3 असे हरवून पुढच्या फेरीत पोहोचलेल्या ओडिशाचा पुढील सामना झारखंड संघाशी होईल. तामिळनाडू संघाने कर्नाटक संघाला 4-2 ने हरवलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.