धोनीच 'बेस्ट' - कर्स्टन


SHARE

मुंबई - क्रिकेटमध्ये धोनीला कर्णधारपदावरुन हटवणं, ही सर्वात मोठी चूक असेल असं मत माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केलंय. 'माझ्या अनुभवावरुन मी सांगू शकतो की, आतापर्यंतच्या सर्व महान कर्णधारांनी चमकदार कामगिरीनं कारकिर्दीचा शेवट केलाय. जर कोणी धोनीला हटवण्यास इच्छुक असेल, तर भारताला ब्रिटनमध्ये २०१९ च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान सामने जिंकून देणाऱ्या चमकदार कामगिरीला मुकावे लागू शकते. धोनी महान खेळाडू आहे. धोनीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे. मी ज्यावेळी भारतात येतो त्यावेळी हा प्रश्न मला विचारण्यात येतो. तीन वर्षांत माझे उत्तर बदलले नाही. मी ज्या कर्णधारांसोबत काम केलं त्यात धोनी निश्चितच सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटसोबत त्याच्या ९-१० वर्षांच्या कारकिर्दीतील आकडेवारी सर्व काही सांगून जाते. त्याने कर्णधार म्हणून भारताला प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावून दिलं.' असंही या वेळी कर्स्टन म्हणालेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या