Advertisement

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ २०१८ माझे लक्ष्य - कविता राऊत


ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ २०१८ माझे लक्ष्य - कविता राऊत
SHARES

'सावरपाडा एक्स्प्रेस' या नावानं ओळखली जाणारी धावपटू कविता राऊत २०१८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी सध्या जोमाने तयारी करतेय. या तयारीचाच भाग म्हणून कविता 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'मध्ये सहभागी होणार आहे. गुरूवारी मुंबईमध्ये या स्पर्धेची औपचारीक घोषणा करण्यात आली.


काय म्हणतेय कविता?

प्रत्येक अॅथलीटसाठी त्याचे रनिंग शूज खूप महत्त्वाचे असतात. मी स्वत: चांगल्या कंपनीचे दर्जेदार शूज वापरते. त्यामुळे माझ्या दुखापतींचं प्रमाणही कमी झालं आहे. नाशिकमध्ये नुकतीच मॅरथॉन स्पर्धा झाली. अत्यंत उत्साहात ही स्पर्धा झाल्यानं मला देखील या स्पर्धेत धावण्याची इच्छा झाली. त्यामुळं मी दिव्यांग मुलांसोबत काही अंतर धावले. 

आतापर्यंत मी इतर शहरांतील मॅरेथाॅनमध्ये अनेकदा धावले, पण मला पहिल्यांदाच माझ्या नाशिक शहरात धावण्याची मिळाली, यांचा मला खूप आनंद झाला. मी सध्या २०१८ च्या ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तयारी करतेय. मुंबई, गोवा मॅरथॉनमधून माझी चांगली तयारी होते. लाॅन्ग डिस्टन्स धावपटूंसाठी हाय अॅटीट्युड ट्रेनिंग खूप महत्त्वची आहे.


धावपटूंना दिला 'हा' सल्ला

केनिया आणि इथिओपियातील धावपटूबद्दल बोलताना कविताने सांगितलं की, २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक दरम्यान आम्ही तेथे जाऊन सराव केला. परदेशात जाऊन सराव केल्यानं काहीच होत नाही. मी स्वत: नाशिक शहरात राहून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आणि यशही मिळवून दाखवलं. तुम्ही किती आणि कशी मेहनत करतात, यावर सारं अवलंबून आहे. नवीन अॅथलीटसाठी मॅरथॉन खूप उत्तम संधी आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केली, तर प्रसिद्धीसोबत पैसेही शकता, असा सल्ला देखील तिने तरूण धावपटूंना दिला.


हेही वाचा - 

रिओ पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा