बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र कुस्ती लीगची दंगल


  • बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र कुस्ती लीगची दंगल
SHARE

महाराष्ट्रातल्या कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी अाता झी टाॅकीज वाहिनीने कंबर कसली असून राकट पैलवानांची रांगडी ताकद अाता महाराष्ट्रातल्या जनतेला पाहता येणार अाहे. अहमदनगर जिल्हा तालीम महासंघातर्फे भारतीय कुस्ती महासंघ अाणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ९ ते १८ मार्चदरम्यान महाराष्ट्र कुस्ती लीगची दंगल रंगणार अाहे.अाॅलिम्पिक खेळाडू घडवण्याचा वसा

जेव्हा अाम्ही झीकडे गेलो, तेव्हा त्यांना अामची संकल्पना प्रचंड अावडली. त्यानंतर त्यांनी मूळ संकल्पनेत बरेचसे बदल करत ही लीग नावारूपाला अाणली. महाराष्ट्रात खाशाबा जाधव यांच्यानंतर एकही अाॅलिम्पिक पदकविजेता खेळाडू घडू शकला नाही. अाता असे खेळाडू घडविण्याकरिता पैलवानांना लागणारी सर्व मदत, परदेशातील प्रशिक्षणाचा खर्च झी वाहिनी पुरवणार अाहे. अाता या लीगद्वारे अाॅलिम्पिक खेळाडू घडवण्याचा वसा झी वाहिनीने उचलला अाहे.


२१ लाख अाणि अर्धा किलो सोन्याची गदा

या कुस्ती लीगसाठी अाठ संघ असतील. प्रत्येक संघात सहा मुले अाणि दोन मुलींचा सहभाग असेल. त्यात दोन राष्ट्रीय, दोन अांतरराष्ट्रीय अाणि चार महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा समावेश असेल. भारतासह इराण, इराक, तुर्कस्तान, यूएसए, जाॅर्जिया, रशिया, मोंगोलिया अाणि युक्रेन या देशातील मल्ल या कुस्ती लीगमध्ये सहभागी होणार अाहेत. विजेत्याला २१ लाख रुपये अाणि अर्धा किलो सोन्याची गदा असे बक्षिस दिले जाणार अाहे.


महाराष्ट्र कुस्ती लीगमधील अाठ संघ

सह्याद्रीचे मावळे, मुंबईचे छावे, पुणेरी पठ्ठे, विदर्भाचे वाघ, दख्खनचे दंगलबाज, राडेबाज मराठवाडा, कोल्हापूरचे वीर, धुरंदर कोकण


खेळाडू कोण?

महाराष्ट्र केसरी विजेता अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगत, शिवछत्रपती पुरस्कार विजेता रणजीत नलावडे, अांतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल अावारे, उत्कर्ष काळे, अाॅलिम्पियन अमितकुमार दहिया यांच्यासह अलेक्झांडर खोस्तियानिस्की (युक्रेन) उनुर्बट पुर्वेजन (युक्रेन) यांसारखे अांतरराष्ट्रीय पैलवान या लीगमध्ये खेळणार अाहेत. तसंच नंदिनी साळोखे (भारत केसरी उपविजेती), स्वाती शिंदे (भारत केसरी), इंदू चौधरी (अांतरराष्ट्रीय मल्ल) या महिला कुस्तीपटूही अापली ताकद पणाला लावणार अाहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या