Advertisement

हृत्विका सरदेसाई हिला राष्ट्रीय पॉवरलिफ्टटिंगमध्ये सुवर्णपदक


हृत्विका सरदेसाई हिला राष्ट्रीय पॉवरलिफ्टटिंगमध्ये सुवर्णपदक
SHARES

पॉवरलिफ्टिंग इंडियातर्फे आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या किशोर-किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ६३ किलो वजनी गटात मुंबईच्या हृत्विका सरदेसाई हिनं सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राला किमान एक सुवर्ण मिळवून देण्याची करामत केली. या स्पर्धेत महाराष्ट्राला १ सुवर्ण, १ रौप्य अाणि १ कांस्यपदक मिळवता आलं. या स्पर्धेत २३ राज्यातील २३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.



३४५ किलो वजन उचललं

हृत्विका सरदेसाई हिने एकूण ३४५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरलं. डेड लिफ्ट प्रकारात (कमरेपर्यंत वजन उचलणं) तिनं १४० किलो तर स्क्वाॅट (वजन खांद्यावर उचलून बैठक मारणं) या प्रकारात तिनं १४५ किलो वजन उचललं. बेंच प्रेस (पाठीवर झोपून छातीवर वजन घेऊन उचलणं) या प्रकारात तिनं ६० किलो वजन उचललं. कर्नाटकच्या रेनिझिया कार्लो हिने ३०५ किलो वजन उचलून दुसरा तर तेलंगणाच्या एम. प्रियाने ३०० किलो वजनासह तिसरा क्रमांक पटकावला.


पुष्कराज सरदेसाईला रौप्य

किशोर गटात पुष्कराज सरदेसाई याने ६६ किलो वजनी गटात रौप्यपदकाचा मान पटकावला. त्यानं ४७५ किलो वजन उचलून दुसरा क्रमांक प्राप्त केला. डेड लिफ्ट प्रकारात २०२ किलो, स्काॅट प्रकारात १८० किलो अाणि बेंचप्रेस प्रकारात ९२ किलो वजन पुष्कराजनं उचललं. तेलंगणाच्या टी. वामशीकृष्णा याने ५१७ किलो वजनासह सुवर्णपदक जिंकलं. १२० किलो वजनी गटात ठाण्याच्या कुशाग्र जोशीनं ५०२ किलो वजनासह कांस्यपदक मिळवलं.


हेही वाचा -

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नील राॅयचा नवा विक्रम

रोहित शर्माची लंडनवारी धोक्यात, रहाणेच्या अाशा पल्लवित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा