Advertisement

वांद्रे इथं रंगणार 'महाराष्ट्र श्री'चा थरार


वांद्रे इथं रंगणार 'महाराष्ट्र श्री'चा थरार
SHARES

मुंबई श्री स्पर्धेनंतर अाता सर्वांचे लक्ष लागले अाहे ते रविवारी २५ फेब्रुवारी रोजी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील पीडब्ल्यूडी मैदानात रंगणाऱ्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेकडे. सलग चार वेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावणाऱ्या सुनीत जाधवसमोर यंदा मात्र कडवे अाव्हान असणार अाहे. सुनीतच्याच तोडीचे महेंद्र जाधव, अतुल आंब्रे, रेणसू चंद्रन, अक्षय मोगरकर, झुबेर शेख, रोहित शेट्टी आणि सुजल पिळणकर हे दिग्गज शरीरसौष्ठवपटू खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.


सुनीतचीत बाजी की नवा विजेता?

गेल्या चार वर्षात सुनित जाधवसमोर कुणाचीच डाळ शिजू शकलेली नाही. प्रत्येक जण त्याच्यासमोर फिका पडला अाहे. अाता मात्र सुनितसमोर अनेक अाव्हानं उभी ठाकली अाहेत. महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर, रेणसू चंद्रन एवढेच नव्हे तर रोहित शेट्टी, सागर माळी, सागर कातुर्डेसारखे जबरदस्त खेळाडूंशी त्याची गाठ पडणार अाहे. त्यामुळे गटफेरीतच स्पर्धेचा निकाल लागण्याची शक्यता अाहे.


यंदाही मुंबईचा दबदबा?

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबईचे 41 खेळाडू निवडण्यात आल्यामुळे यंदाही महाराष्ट्र श्रीमध्ये मुंबईचाच दबदबा राहणार, हे निश्चित अाहे. २० शरीरसौष्ठवपटू मुंबई शहरचे तर २१ खेळाडू मुंबई उपनगरचे प्रतिनिधित्व करतील. मुंबई उपनगरमधून संदेश सकपाळ, नितीन शिगवण, तेजस भालेकर, बप्पन दास, प्रतिक पांचाळ, आदित्य झगडे, सुजीत महापात्रा, विशाल धावडे, जगदीश कदम, सुशील मुरकर, रोहन गुरव, अभिषेक खेडेकर, सुधीर लोखंडे, रोहित शेट्टी, सुजन पिळणकर, रसेल दिब्रीटो, सकिंदर सिंग, सचिन कुमार, सचिन डोंगरे, महेश राणे आणि नितीन रूपारेल हे खेळाडू अापला जलवा दाखवतील. तर सुनीत जाधव, अतुल आंब्रे, सागर कातुर्डे, ओमकार आंबोवकर, राजेश तारवे, विनायक गोळेकर, आकाश बाणे, जगदीश कदम, उमेश पांचाळ, विघ्नेश पंडित, चिंतन दादरकर, समीर भिल्लारे, सौरभ साळुंखे, सुशांत रांजणकर, सुयश पाटील, अनिकेत पाटील, प्रशांत परब, रोहन धुरी, दीपक तांबिटकर आणि श्रीदीप गावडे हे मुंबईच्या संघातून आपला जोर लावतील.


दहा लाखांची बक्षिसं आणि एनफिल्ड

महाराष्ट्र श्री स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल पाच खेळाडूंवर अनुक्रमे १५, १२, १०, ८ अाणि ५ हजार असा रोख पुरस्कारांचा पाऊस पडेल. विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड बुलेट बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. उपविजेता ५० हजारांचा तर द्वितीय उपविजेता २५ हजारांचा मानकरी ठरेल.


हेही वाचा - 

महाराष्ट्र श्री किताब विजेत्याला मिळणार राॅयल एनफिल्ड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा