Advertisement

मनदीपच्या हॅटट्रिकमुळे अोएनजीसीचा सहज विजय


मनदीपच्या हॅटट्रिकमुळे अोएनजीसीचा सहज विजय
SHARES

भुवनेश्वर इथं झालेल्या वर्ल्ड हाॅकी लीगमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मनदीप सिंग यानं पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करत ५२व्या बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेत अोएनजीसीला मुंबई कस्टम्सविरुद्धच्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. मनदीपच्या हॅटट्रिकमुळे अोएनजीसीने हा सामना ६-१ असा अारामात जिंकला.


चर्चगेट येथील एमएचएएल महिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात अोएनजीसीने २३व्या मिनिटालाच ४-० अशी मजबूत अाघाडी घेतली होती. त्यात गुरजंत सिंग (दुसऱ्या मिनिटालाा), निलम झेस (१८व्या मिनिटाला), नवज्येत सिंग (२०व्या मिनिटाला) अाणि मनदीप सिंग (२३व्या मिनिटाला) यांच्या गोलचा समावेश होता. त्यानंतर मनदीपने ४२व्या अाणि ४९व्या मिनिटाला गोल करत हॅटट्रिक साजरी केली. मुंबई कस्टम्सकडून एकमेव गोल नवप्रीत सिंगने ४५व्या मिनिटाला गोल केला.


'कॅग'ची बीपीसीएलशी बरोबरी

भारतीय महालेखापाल (कॅग) संघाने बीपीसीएल (भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड) संघाविरुद्धच्या ब गटातील सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. वरुण कुमारने २०व्या मिनिटाला पेनल्टी-स्ट्रोकवर गोल करून बीपीसीएलला खाते उघडून दिले. त्यानंतर ६०व्या मिनिटाला इम्रान खानने गोल करून कॅगला बरोबरी साधून दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा