Advertisement

मोंगोलियाची बाखुयाग मुंगूनटूल ठरली महिला बुद्धिबळाची चॅम्पियन!


मोंगोलियाची बाखुयाग मुंगूनटूल ठरली महिला बुद्धिबळाची चॅम्पियन!
SHARES

मोंगोलियाची अव्वल मानांकित अांतरराष्ट्रीय मास्टर बाखुयाग मुंगूनटूल (एलो २४१०) हिने अापल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एसबीअाय लाइफ-एअायसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अापले विजेतेपद निश्चित केले. ११व्या फेरीत रशियाच्या महिला अांतरराष्ट्रीय मास्टर एलेना तोमिलोव्हा हिच्यावर मात करत मुंगूनटूल हिने विजेतेपदाला गवसणी घातली.


अशी घेतली अाघाडी

इंडियन चेस स्कूल अाणि साऊथ मुंबई चेस अकॅडमी यांच्या विद्यमाने अाणि अाॅल इंग्लंड चेस फेडरेशनच्या मान्यतेखाली चेंबूर येथील द एकर्स क्लबवर सुरू असलेल्या या महिलांसाठीच्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत ३० वर्षीय मुंगूनटूल दहाव्या फेरीअखेर दुसऱ्या स्थानी होती. मात्र ११व्या फेरीत एलेना तोमिलोव्हा (एलो २३३४) हिला हरवून मुंगूनटूलने एका गुणाची कमाई केली अाणि ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत अाठ गुणांची कमाई करून विजेतेपद संपादन केले.


गुलिश्कनचे विजेतेपद हुकले

नवव्या फेरीअखेर अाघाडीवर असलेली कझाकस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलिश्कन नाखबायेव्हा (एलो २३२३) हिला शेवटच्या फेरीत कामगिरीत सातत्य राखता न अाल्यामुळे विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. अखेरच्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (एलो २२०७) हिने अापल्यापेक्षा वरचढ असलेल्या कजाकस्तानच्या गुलिश्कनविरुद्ध सुरेख कामगिरी करत गुलिश्कनला पराभवाचा धक्का दिला. गुलिश्कनला ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूची श्रीजा हिने सात गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.


अाकांक्षा हगवणे पाचव्या स्थानी

व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो (एलो २३७६) हिने भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (एलो २२७९) हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करली अाणि सात गुणांसह चौथे स्थान प्राप्त केले. भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे ६.५ गुणांसह पाचव्या स्थानी राहिली तर महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल अाणि मोनिषा जी. के. यांनी प्रत्येकी ५.५ गुणांसह सहावे अाणि सातवे स्थान प्राप्त केले.


हेही वाचा -

बुद्धिबळपटू श्रीजा शेषाद्रीची बेल्जियमच्या अॅना झोझुलियावर मात

बुद्धिबळपटू अाकांक्षा हगवणेची दमदार सुरुवात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा