Advertisement

बुद्धिबळपटू श्रीजा शेषाद्रीची बेल्जियमच्या अॅना झोझुलियावर मात


बुद्धिबळपटू श्रीजा शेषाद्रीची बेल्जियमच्या अॅना झोझुलियावर मात
SHARES

भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री हिने जोमाने पुनरागमन करत नवव्या फेरीत बेल्जियमच्या अांतरराष्ट्रीय मास्टर अॅना झोझुलिया हिला पराभवाचा धक्का देत एसबीअाय लाइफ-एअायसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या विजयाची नोंद केली होती.


यांच्यावर मिळवले विजय

श्रीजाने याअाधी महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (भारत, २२७९), महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे (भारत, २२९७) अाणि महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख (भारत, २१३८) यांच्यावर विजय संपादन केले होते. अाता बेल्जियमच्या अॅना झोझुलियावर (एलो २३१४) सरशी साधून श्रीजाने नवव्या फेरीअखेर उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा (एलो २३७९) हिच्यासह संयुक्तपणे पाचवं स्थान प्राप्त केलं अाहे.


अाकांक्षा तिसऱ्या स्थानी

सहाव्या पटावर अाकांक्षा हगवणे हिने भारताच्याच दिव्या देशमुख (२१३८) हिच्यावर शानदार विजयाची नोंद करत व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो (एलो, २३७६) हिच्यासह प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले अाहे.


हेही वाचा -

बुद्धिबळ : अाकांक्षा हगवणेची संमिश्र कामगिरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा