Advertisement

बुद्धिबळ : अाकांक्षा हगवणेची संमिश्र कामगिरी


बुद्धिबळ : अाकांक्षा हगवणेची संमिश्र कामगिरी
SHARES

भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर अाकांक्षा हगवणे (एलो २२९७) हिने शुक्रवारी सुरेख कामगिरीचे प्रदर्शन केलं. एसबीअाय लाइफ-एअायसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अाकांक्षा हिनं मोंगोलियाची अव्वल मानांकित अांतरराष्ट्रीय मास्टर बाखुयाग मुंगूनटूल हिच्यावर चौथ्या फेरीत विजय मिळवला. तर पाचव्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (एलो २२०७) हिनं अाकांक्षाला पराभूत केलं.


श्रीजा शेषाद्रीचे सलग दोन विजय

इंडियन चेस स्कूल अाणि दक्षिण मुंबई चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अाॅल इंडिया चेस फेडरेशनच्या (एअायसीएफ) अधिपत्याखाली चेंबूर येथील द एकर्स क्लबवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अाकांक्षाकडून चौथ्या फेरीतील विजयानंतर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना तिला पाचव्या फेरीत हार पत्करावी लागली. श्रीजा शेषाद्री हिचा हा सलग दुसरा विजय ठरला. श्रीजा हिने चौथ्या फेरीत भारताची महिला अांतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (एलो २२७९) हिला हरवले होते.



गुलिश्कनची विजयी परंपरा खंडित

कझाकस्तानच्या पाचव्या मानांकित महिला ग्रँडमास्टर गुलिश्कन नाखबायेव्हा (एलो २३२३) हिची चार सामन्यांची विजयी परंपरा अखेर उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा (एलो २३७९) हिने संपुष्टात अाणली. पाचव्या फेरीत गुलरुखबेगिमने गुलिश्कनला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह गुलरुखबेगिमने चार गुणांसह व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो (एलो २३७६) हिच्यासह संयुक्तपणे अग्रस्थान प्राप्त केले अाहे.


हेही वाचा -

बुद्धिबळ : कझाकस्तानची गुलिश्कन तिसऱ्या विजेतेपदासह अाघाडीवर

बुद्धिबळपटू अाकांक्षा हगवणेची दमदार सुरुवात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा