शिवाजियन्सची मुंबईवर मात

 Mumbai
शिवाजियन्सची मुंबईवर मात
Mumbai  -  

मुंबई - आयलीग फूटबॉल टूर्नामेंटमध्ये शनिवारी डीएसके शिवाजियन्सने मुंबई फुटबॉल क्लबवर दणदणीत विजय मिळवला. शिवाजियन्स संघाने 5-0 ने मुंबईला हरवत सामना खिशात घातला. शिवाजियन्सच्या होलीचरण नारजरीने पहिल्या सत्रात 18 व्या आणि 30 व्या मिनटाला दोन गोल केले. तर संजू प्रधान याने 48 व्या मिनटाला, लालियानजुआला चांगते याने 67व्या मिनटाला गोल करत संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. विशेष म्हणजे लालियानजुआला चांगते आणि जैरी माविहमिंगथांगा याने दुसऱ्या सत्रात शानदार गोल करत सामना खिशात घातला. या विजयामुळे शिवाजियन्स संघ 14 मॅचमध्ये 14 अंक मिळवत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबई 10 अंकांसह 10 व्या स्थानावर आहे.

Loading Comments