मुंबई एफसीचा सामना मोहन बगानशी

 Churchgate
मुंबई एफसीचा सामना मोहन बगानशी

कुलाबा - आयलीग मधील एक महत्त्वपूर्ण सामना गुरुवारी मुंबई एफसी विरूद्ध मोहन बागन यांच्यामध्ये होणार आहे. आयलीगमध्ये मुंबईने सुरुवातील चांगली खेळी केली मात्र नंतर सलग सहा सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान सामन्याच्या आधी मुंबईचे प्रशिक्षक कश्यपने बजेट आणि चांगल्या खेळाडूंच्या अभावामुळे चांगला संघ बनवायला वेळ लागल्याचे सांगितले. या सामन्यात स्टीव्हन, आणि व्हिक्टोरिनो फर्नांडिस जखमी असल्याने खेळणार नसल्याचे त्यांनी सांगतिले. आज संध्याकाळी मोहन बगान यांच्यासोबत सामना झाल्यानंतर रविवारी मुंबईचा सामना बेंगलुरा एफसीसोबत होणार आहे. जर या लीगमध्ये टीकून राहायचं असेल तर मुंबईला या दोन्ही संघांना पराभूत करावं लागेल.

Loading Comments