Advertisement

मुंबईच्या सुदिप्ता कुमारने पटकावले सीसीअाय टेनिस स्पर्धेचे जेतेपद


मुंबईच्या सुदिप्ता कुमारने पटकावले सीसीअाय टेनिस स्पर्धेचे जेतेपद
SHARES

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या सुदिप्ता सेंथिल कुमार हिने चिकाटीने खेळ करत, प्रसंगी कडवी लढत देत हरयाणाच्या संदीप्ती राव हिचा ७-५, ७-६ (३) असा पाडाव करत एमएसएलटीए-योनेक्स सनराइज १२व्या रमेश देसाई स्मृती चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अखिल भारतीय १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुदिप्ताने विजयासह २०० एअायटीए रँकिंग गुणांची कमाई केली तर संदीप्तीला १५० गुणांवर समाधान मानावे लागले.


संदीप्तीची भक्कम अाघाडी

हरयाणाच्या संदीप्तीने तीन वेळी सुदिप्ताची सर्व्हिस भेदत ५-१ अशी अाघाडी घेतली होती. मात्र सुदिप्ताने २-५ अशा स्थितीतून कोणतेही दडपण न घेता जोमाने पुनरागमन केले. सलग पाच गेम जिंकत सुदिप्ताने पहिला सेट एक तास अाणि ९ मिनिटांत अापल्या नावावर केला.


दुसऱ्या सेटमध्ये सुदिप्ताचा बोलबाला

दुसऱ्या सेटमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन करत ५-३ अशी भक्कम अाघाडी घेतली होती. मात्र तिचे खेळावरील नियंत्रण सुटल्यानंतर प्रतिस्पर्धीला कमबॅक करण्याची संधी मिळाली. ६-६ अशा बरोबरीनंतर टाय-ब्रेकरमध्ये खेळवण्यात अालेल्या गेममध्ये मात्र सुदिप्ताने हरयाणाच्या खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही. टाय-ब्रेकरमध्ये दुसरा गेम ७-३ अशा फरकाने जिंकून सुदिप्ताने मुलींच्या एकेरीचे जेतेपद पटकावले.


हेही वाचा -

सीसीअाय टेनिस : दिवेश गेहलोत, सुदिप्ता कुमार अंतिम फेरीत

संबंधित विषय
Advertisement