ड्रीम मुंबई मॅरेथॉन!

मुंबई - मुंबई मॅरेथॉन दरवर्षी मुंबईत भरणारा जिद्दीचा, एनर्जीचा आणि प्रचंड उत्साहाचा महामेळा. मुंबईकरांसोबतच भारत आणि जगभरातल्या तमाम धावपटूंना आकर्षित करणारा इव्हेंट. सेलिब्रिटि विश्वापासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच या मॅरेथॉनचं आकर्षण. दरवर्षी या मॅरेथॉनमध्ये एका वेगळ्याच मुंबईची ओळख होते. तशीच ती यावर्षीही झाली. मॅरेथॉनच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मुंबईकरांसोबतच सर्वच स्पर्धकांचा तेवढाच उत्साह दिसून येत होता. बहुधा प्रत्येक क्षेत्रातली किमान एक तरी व्यक्ती मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. तशीच प्रत्येक वयोगटातलेही स्पर्धक इथे दिसून आले. सर्व प्रकारचे भेदभाव इथे अदृश्य झाले होते.

 मुंबई मॅरेथॉन 2017 महिला गटातील विजेती ज्येत्स्ना गवते

 

 

 मुंबई मॅरेथॉन 2017 महिला गटातील दुसऱ्या क्रमांकाची विजेती श्यामली सिंग

 

 

कॅन्सरशी यशस्वी लढा दिल्यानंतर 86व्या वर्षीही मॅरेथॉन पार करण्याची हिंमत दाखवणारा 86 वर्षांचा तरूण!

 

 

भल्या पहाटे मॅरेथॉनसाठी जावं लागलं. मात्र गोठवणारी थंडीही या महिलांना थांबवू शकली नाही!

 

 

मॅरेथॉनमधल्या धावपटूंना लागणाऱ्या एनर्जीसाठी झटणारी ही बच्चेकंपनी! यांचा उत्साह जबरदस्तच!

 

Loading Comments