Advertisement

शरीरसौष्ठवपटू 'मुंबई-श्री' किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज

मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली 'मुंबई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष शुक्रवारपासून रंगणार अाहे.

शरीरसौष्ठवपटू 'मुंबई-श्री' किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज
SHARES

मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली 'मुंबई श्री' (Mumbai Shree) शरीरसौष्ठव स्पर्धेचा (Bodybuilding Competition) पीळदार संघर्ष शुक्रवारपासून रंगणार अाहे. अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील (Andheri Lokhandwala Complex) सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबवर (Celebration Sports Club) रंगणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे. तसंच, २००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू प्रतिष्ठेच्या ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गतवर्षी विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले भास्कर कांबळी, सुशील मुरकर, उमेश गुप्ता, नीलेश दगडे, दीपक तांबीटकर, सुशांत रांजणकरसारखे शरीरसौष्ठवपटू आपलं स्वप्न साकार करण्यासाठी उत्सुक आहेत. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना (Brihanmumbai Bodybuilding Association) तसंच, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेतर्फे (Mumbai Suburban Bodybuilding & Fitness Association) होणाऱ्या या स्पर्धेत ५५ ते ९० किलोवरील अशा ९ गटांमध्ये किताबासाठी चुरस रंगणार आहे. पुरुषांच्या फिटनेस फिजिक प्रकारातही १००पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत.

गेल्या वर्षीपासून माजी विजेत्यांनाही स्पर्धेत उतरण्याची परवानगी असली तरी ‘मुंबई-श्री’ विजेत्यांनी यंदाही स्पर्धेकडे पाठ फिरवत नवख्या खेळाडूंना हा मान पटकावण्याची संधी दिली आहे. गेल्या वर्षी जेतेपदाचे स्वप्न भंगलेल्या सुशील मुरकरने यंदा जय्यत तयारी केली आहे.

‘नवोदित मुंबई-श्री’चा मानकरी गणेश उपाध्याय, ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ वैभव जाधव आपल्या गटात कमाल दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर सुशांत रांजणकर आणि दीपक तांबिटकर हेसुद्धा चांगल्या तयारीत असल्यामुळं ‘मुंबई-श्री’ किताब कोण मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा -

एसी लोकलमध्ये गारेगार प्रवासासह मनोरंजनाची सुविधा

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा