Advertisement

पंजाब पोलिसांची इंडियन नेव्हीवर मात


पंजाब पोलिसांची इंडियन नेव्हीवर मात
SHARES

तेराव्या 'पीएमसी बॅंक गुरु तेग बहाद्दूर गोल्ड कप हॉकी टुर्नामेंट'मध्ये गुरुवारी झालेल्या 'अ' गटातील लढतीत पंजाब पोलिसांनी इंडियन नेव्हीला ४-३ अशा फरकाने हरवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ही स्पर्धा महिंद्रा स्टेडियम, चर्चगेट येथे खेळवण्यात आली होती.



इंडियन नेव्हीने सुरुवातीच्या १८ व्या मिनिटाला गोल करून खाते उघडले आणि त्यानंतर पाचच मिनिटांत दुसरा गोल करून पंजाब पोलिसांवर २-० अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर पंजाब पोलिसांनी वेगवान खेळ करून लागोपाठ दोन गोल नोंदवून हा सामना बरोबरीत आणून ठेवला.
त्यानंतर इंडियन नेव्हीने आणखी एक गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवली खरी, परंतु पुन्हा एकदा पंजाब पोलिसांनी तुफान खेळाचे प्रदर्शन घडवत लागोपाठ दोन गोल करून सामना ४-३ अशा फरकाने जिंकला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा