Advertisement

जुहूमध्ये गोकुळाष्टमीसाठी वाहतुकीत बदल

3 आणि 4 सप्टेंबरला विशेष निर्बंध

जुहूमध्ये गोकुळाष्टमीसाठी वाहतुकीत बदल
SHARES

जुहू येथील हरे रामा हरे कृष्ण मंदिर अर्थात इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांच्या पश्चिम उपनगर विभागाने विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने 3 आणि 4 सप्टेंबर रोजी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जुहू परिसरातील काही रस्त्यांवर नो पार्किंग, नो एंट्री आणि वन-वेचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हे निर्बंध पुढील कालावधीत लागू राहतील—

  • 3 सप्टेंबर 2026 दुपारी 3.30 ते 4 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत

  • 4 सप्टेंबर 2026 दुपारी 4 ते 5 सप्टेंबर पहाटे 2 वाजेपर्यंत

वाहतूक पोलिसांचे उपायुक्त अजित बोरहाडे यांच्या आदेशानुसार, मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिसूचनेनुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नो पार्किंग

खालील रस्त्यांवर वाहन पार्क करण्यास बंदी असेल—

  1. जनार्दन म्हात्रे रोड

  2. मुक्तेश्वर देवालय मार्ग

  3. जुहू चर्च रोड

  4. गांधी ग्राम रोड

  5. अल्फ्रेड क्रेडो रोड

  6. संत ज्ञानेश्वर मार्ग

  7. श्यामराव परुळेकर मार्ग (N.S. रोड क्रमांक 13)

  8. बलराज सहानी रोड

  9. ए. बी. नायर रोड

  10. देवळे रोड (मिलिटरी रोड)

नो एंट्री

मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांदोक चौकाकडून उत्तर ते दक्षिण दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. मात्र आपत्कालीन सेवा, व्हीव्हीआयपी, मंदिराची वाहने आणि स्थानिक रहिवाशांना यातून सूट देण्यात आली आहे.

अल्फ्रेड क्रेडो रोडकडून दक्षिण ते उत्तर दिशेने मुक्तेश्वर देवालय मार्गावरही सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.

तसंच, श्यामराव परुळेकर मार्गावरून संत ज्ञानेश्वर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर मार्ग जंक्शन ते देवळे रोड जंक्शनदरम्यान पूर्वेकडून पश्चिमेकडे मिलिटरी रोडच्या दिशेनेही नो एंट्री असेल.

वन-वे

संत ज्ञानेश्वर मार्ग ते मुक्तेश्वर देवालय मार्ग हा रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे.

गोकुळाष्टमीच्या काळात जुहू आणि आसपासच्या भागात वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तात्पुरते वाहतूक फलक आणि डायव्हर्जन मार्गांचा वापर करावा, तसेच शक्य असल्यास प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


हेही वाचा

पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा