Advertisement

मुंबई सुपर लीगला गुरूवारपासून सुरूवात


मुंबई सुपर लीगला गुरूवारपासून सुरूवात
SHARES

वरळीतील 'एनएससीआय' स्टेडियमवर इलेव्हन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या 'मुंबई सुपर लीग टेबल टेनिस चॅम्पियनशीप' स्पर्धेला गुरूवार 8 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील गतविजेता संघ 'किंग पॅंग वे'ची कामगिरी बघण्यास प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

गेल्या स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या 'कूल स्मॅशर' संघाने देखील यंदा कामगिरी उंचावण्याची प्रतिज्ञा केली आहे. चार दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत शहरातील प्रमुख खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेतील विजेत्या संघास 1,80,000 रुपये, तर उपविजेत्या संघाला 1,20,000 आणि तिसऱ्या व चौथ्या संघाला अनुक्रमे 70,000 आणि 50,000 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघात सहा खेळाडूंचा समावेश असेल (प्रत्येक पुरुष, महिला, लहान मुले, लहान मुली, कॅडेट मुले आणि अनुभवी). तसेच हे 10 संघ प्रत्येकी 5 याप्रमाणे 2 गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटातील सर्वोच्च 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते अंतिम सामना खेळतील.

उपांत्य फेरी आणि अंतिम सामना रविवारी, 11 जून रोजी होईल. या स्पर्धेत प्रत्येक गट पुढील प्रमाणे खेळेल : पुरुष खेळाडू 2 सामने खेळेल (1 एकेरी आणि 2 दुहेरी), महिला 2 सामने (1 एकेरी आणि 1 दुहेरी), लहान मुले -2 सामने (1 एकेरी आणि 1 दुहेरी), लहान मुली - 2 सामने (1 एकेरी आणि 1 दुहेरी) 1 दुहेरी), कॅडेट मुले - 1 मॅच (1 एकेरी), ज्येष्ठ नागरीक - 2 सामने (1 एकेरी आणि 1 दुहेरी).

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा