मुंबईचा श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार

  Churchgate
  मुंबईचा श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार
  मुंबई  -  

  मुंबई - आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला आणखी एक धक्का बसलाय. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला कांजिण्या आल्याने तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू असून किमान पहिला आठवडाभर तरी त्याला खेळता येणार नाहीये. 

  श्रेयसच्या आजारपणामुळे दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविडलाही श्रेयसकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात श्रेयसने भरीव कामगिरी करून द्विशतकही ठोकले होते. दिल्ली संघात याआधी जे.पी. ड्युमिनी आणि क्विन्टन डीकॉक या खेळाडूंनी दुखापातीच्या कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे दिल्ली संघाची फंलदाजीही कमजोर झाल्याचे दिसत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.