मुंबईच्या स्वप्नील शाहचा सामना बरोबरीत

  Mumbai
  मुंबईच्या स्वप्नील शाहचा सामना बरोबरीत
  मुंबई  -  

  मुंबई - उडुपीत सुरू असलेल्या दृष्टीहिन आशियाई चेस स्पर्धेतील सहावी फेरी अत्यंत चुरशीची ठरली. मंगळवारी मुंबईच्या स्वप्नील शाह (१७०५) आणि किशन गांगुली (१९७३) यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. तब्बल ५९ चालींनंतर हा सामना बरोबरीत सुटला आणि दोन्ही खेळाडूंना अर्धा गुण मिळाला.

  तर दुसऱ्या सामन्यात ठाणातल्या शिरीष पाटील (१६८१) ने ३३ चालींनी मात देत मिलिंद सामंतला (१६२१) पराभूत केलं.

  मुंबईच्या सचिन वाघमारे (१६००) आणि वैशाली सालवकर (१४३१) यांच्यात रंगलेला सामना देखील अटीतटीचा राहिला. यामध्येही दोन्ही खेळाडूंनी एक दुसऱ्यांना मात देण्याचा प्रयत्न केला. मात्र ४४ चालींनंतर वैशालीला पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत आणखी २ फेऱ्या बाकी आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.