Advertisement

मुंबईकरांनी अमेरिकेत जिंकली पिकलबॉल स्पर्धा


मुंबईकरांनी अमेरिकेत जिंकली पिकलबॉल स्पर्धा
SHARES

अमेरिकेत सोमवारी झालेल्या 'गामा पिकलबॉल क्लासिक स्पर्धे'त विजय मिळवून मुंबईकर खेळाडूंनी भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे. या स्पर्धेतील दुहेरी सामन्यात समित कोरगावकर आणि सचिन पाठारे (4.5 मानांकन गट) यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले. तर खुल्या वर्गात रवी शेट्टीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा 'युनायटेड स्टेटस ऑफ अमेरीका पिकलबॉल असोसिएशन'च्या (युएसएपीए) मान्यतेने पेन्सिल्विनिया येथील पीट्सबर्ग येथे खेळवण्यात आली.


कसा झाला खेळ

या स्पर्धेत खुल्या वर्गात पुरूष गटातील दुहेरी सामन्यात खेळताना रवी शेट्टीने गेराल्ड अल्वारडोसह उत्कृष्ट खेळ केला. अंतिम सामन्यात त्यांना पॉल ऑलिन-जोश एलेनबोगेन या प्रतिस्पर्ध्यांकडून 5-11, 11-6, 14-16, असा पराभव पत्कारावा लागला. पहिला सेट हरल्यानंतर रवी- गेराल्ड या जोडीने दुसरा सेट जिंकून सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. परंतु तिसऱ्या सेटमध्ये दुखापात झाल्याने रवी-गेराल्ड या जोडीला पराभव पत्कारत रौप्य पदकावर सामधान मानावे लागले.

अंतिम सामना (4.5 मानांकन गट) भारताच्या खेळाडूंमध्येच रंगला होता. पुरुष दुहेरी गटाच्या अंतिम सामन्यात देखील रवीला दुखापतीचा फटका बसला. त्याच्या दुखापतीमुळे समित कोरगावकर- सचिन पाठारे यांना सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत भारताचे वर्चस्व होते.


मुंबईकरांनी जिंकलेली पदके

मुंबईतही पिकलबॉलची क्रेझ वाढलेली आहे. आतपर्यांत जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबईकरांनी आपली छाप पाडली आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवर देखील मुंबईकरांनी आपला दर्जा सिद्ध केला आहे. भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण,4 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण 13 पदकांची कमाई केली आहे. त्यातील 12 पदके मुंबईकरांनी पटकावलेली आहेत.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा