Advertisement

मोहम्मद शेखची हॅटट्रीक; तिसऱ्यांदा जिंकली सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा

सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत मोहम्मद नुबेरशाह शेख याने सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावत हॅटट्रीक केली आहे.

मोहम्मद शेखची हॅटट्रीक; तिसऱ्यांदा जिंकली सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा
SHARES

सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत मोहम्मद नुबेरशाह शेख याने सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावत हॅटट्रीक केली आहे. मोहम्मद शाह याला २७ हजार रुपयांची रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मनित करण्यात आलं. या स्पर्धेत प्रणव शेट्टी उपविजेता ठरला असून, त्याला २१ हजार रुपयांची रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आलं.


स्पर्धेच ६ वं पर्व

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा घेण्यात आली.  यंदा स्पर्धेचं ६ वं पर्व होतं. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्लब इथं सतीश सबनीस फाऊंडेशन आणि एमआयजी क्लबतर्फे या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं.


२७० खेळाडूंचा सहभाग

या बुद्धिबळ स्पर्धेत एकूण २७० खेळाडूंनी सहभाग घेतला. लहान मुलांसह दृष्टीहीन खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. सतीश सबनीस फाउंडेशनचे विश्वस्त मिलिंद सतीश सबनीस, एमआयजी क्रिकेट क्लबचे जनरल सेक्रेटरी निकुंज व्यास, एमआयजी क्रिकेट क्लबचे चेअरमन संजीव पत्की आणि मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे विश्वनाथ माधव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. हेही वाचा -

माझ्यावरील आरोप निराधार; उर्मिला मातोंडकरचं स्पष्टीकरण

मुंबईकरांना मिळणार वेगवान ४७ एसी लोकलRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement