Advertisement

मुंबई स्नूकर लीग स्पर्धेत ऑटर्स रॉकेट्सला जेतेपद


मुंबई स्नूकर लीग स्पर्धेत ऑटर्स रॉकेट्सला जेतेपद
SHARES

गतविजेत्या अाॅटर्स राॅकेट्स संघाने बीएसएएम मुंबई स्नूकर लीग स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावण्याची करामत केली. अाॅटर्स क्लब बिलियर्डस रूममध्ये रंगलेल्या अंतिम लढतीत अाॅटर्स क्लबच्या राॅकेट्स संघाने रेडियो टायगर्स संघावर ३-१ अशा फरकाने मात करत विजेतेपद संपादन केले. या विजेतेपदासह अाॅटर्स राॅकेट्स संघाने ७५ हजार रुपयांची कमाई केली तर रेडियो टायगर्स संघाला ४५ हजारांवर समाधान मानावे लागले.


सुरुवातीलाच २-०ने अाघाडी

घरच्याच कोर्टवर खेळणाऱ्या अाॅटर्स राॅकेट्सने चारपैकी तीन फ्रेम जिंकत अापली छाप पाडली. १५ रेड सिंगलच्या पहिल्या फ्रेममध्ये अभिमन्यू गांधीने सुरेख कामगिरी करत सौरभ मेहरोत्राला ९७-७९ असे हरवले. त्यानंतर फाॅर्मात असलेला कर्णधार झेनुल अरसीवाल याने नबील लाकडावालाच्या साथीने मेर्झी स्क्रूवाला अाणि बदरी करिमी यांचा ८०-५२ असा पाडाव करत राॅकेट्सची अाघाडी २-० अशी वाढवली.


राॅकेट्सची घोडदौड रोखली

तिसऱ्या फ्रेममध्ये मात्र अाॅटर्स राॅकेट्सची विजयी घोडदौड रोखत रेडियो टायगर्सने त्यांना कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या फ्रेममध्ये राॅकेट्सच्या रिषभ ठक्करला विमल मारीवालाने ३०-८९ अशा फरकाने पराभूत केले. मात्र चौथ्या फ्रेममध्ये अभिमन्यू गांधीने मेर्झी स्क्रूवाला याच्यावर थरारक लढतीत ८६-८० असा विजय मिळवून अाॅटर्स राॅकेट्सच्या विजयावर ३-१ असे शिक्कामोर्तब केले.


हेही वाचा -

मुंबई स्नूकर लीगमध्ये आर्क चिताज, ऑटर्स रॉकेट्स उपांत्य फेरीत

गॅरी कर्स्टन घेणार मुंबईतील प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध

अखेर एमसीएने दिला 'त्या’ खेळाडूंना न्याय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा