आरसीएफ फुटबॉल टुर्नामेंटमध्ये एअर इंडिया चॅम्पियन

  Mumbai
  आरसीएफ फुटबॉल टुर्नामेंटमध्ये एअर इंडिया चॅम्पियन
  मुंबई  -  

  चेंबूर - 110 आरसीएफ नाडकर्णी फुटबॉल टुर्नामेंटमध्ये एअर इंडियाने पिफा कोलाबा संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात एअर इंडियाने 'पिफा'ला 3-2 ने धूळ चारत रोमहर्षक विजय मिळवला. मागील वर्षी उपविजेतेपद पटकावलेल्या एअर इंडियाने 19 व्या आणि 25 व्या मिनटाला गोल करत सामन्यावर पकड मिळवली. मात्र त्यानंतर पिफा कोलाबाच्या खेळाडूंनी गोल करण्याची एकही संधी एअर इंडियाला दिली नाही.

  विशेष म्हणजे 41 व्या मिनिटाला पिफाच्या नायजेरियन खेळाडू एल्विस ओजवाराने गोल करत एअर इंडियावर पहिला गोल केला. 47 व्या मिनिटाला एअर इंडियाला एक संधी मिळाली आणि त्यांनी अर्धवेळात 3-1 ची लीड घेतली. सेकंड हाफमध्ये नव्या जोशात आलेल्या पिफा कुलाबाच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. शेवटच्या मिनिटात देखील पिफा मिळालेल्या संधीचं सोनं करू शकलं नाही आणि अखेर एअर इंडियाने 3-2 ने सामना जिंकला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.