रेगन, मानसीच्या उत्कृष्ट खेळीने किंग पाँगचा विजय

 Worli
रेगन, मानसीच्या उत्कृष्ट खेळीने किंग पाँगचा विजय
Worli, Mumbai  -  

मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेत किंग पाँग संघाचे स्टार खेळाडू असलेले रेगन अल्बुकर्क आणि मानसी चिपळूणकर या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी करत एसीई संघाला 7-2 अशा फरकाने पराभूत करून दुसऱ्यांदा विजय मिळवला. इलेव्हन एव्हन स्पोर्ट्सने आयोजित केलेली ही स्पर्धा शुक्रवारी वरळीच्या 'एनएससीआय' येथे झाली.

रेगन आणि मानसी या दोन्ही खेळाडूंनी कनिष्ठ मुले आणि मुली गटातील मिश्र दुहेरी सामन्यातील आव्हान ओळखले होते. त्यानुसार त्यांनी त्यांचे एकेरीचे सामनेही जिंकले. किंग पाँग संघातील प्रिती भोसले हिने महिला एकेरी स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर तिने मुदुत दानीला मिश्र दुहेरी स्पर्धेत चांगली साथ देत तेथेही विजय मिळवला.  

ग्रुप 'ए' च्या दुसऱ्या सामन्यात विद्यमान विजेता सुप्रिमो फायटर्स विरुद्ध एमटीसी रॉयल्समध्ये झालेल्या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत सुप्रिमो फायटर्सने 4-5 अशा फरकाने एमटीसी रॉयल्सचा पराभव केला.

Loading Comments