Advertisement

एनएससीआय बॅडमिंटन लीगमध्ये राजधानी रॉयल्सची शानदार कामगिरी


एनएससीआय बॅडमिंटन लीगमध्ये राजधानी रॉयल्सची शानदार कामगिरी
SHARES

तिसऱ्या एनएससीआय बॅडमिंटन लीगच्या पहिल्या सामन्यातील दुहेरी फेरीत राजधानी रॉयल्सने धमाकेदार कामगिरी करत विजय साकारला. राजधानी रॉयल्सने 3-2 ने प्रतिस्पर्धी मावेरीक एसेसवर मात करत सामना खिशात घातला. ही स्पर्धा एनएससीआय स्टेडियमवर खेळवण्यात आली.


राजधानीचा विजय

दुहेरी गटात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजधानीच्या संदीप डिल्लोन आणि निखिल भन्साळी यांनी मावेरीकच्या रवी पंजाबी, संकेत गांधी यांना पहिल्या सेटमध्ये 23-21ने मात देत आपला दबदबा राखला. दुसऱ्या सेटमध्ये राजधानीच्या खेळाडूंनी 21-11 आशा बड्या फरकाने धूळ चारत एकहाती विजय मिळवला.


मिश्र गटात मावेरीक विजयी

मिश्र गटात राजधानी रॉयल्सला पराभवाचा फटका मिळाला. मावेरीकच्या हमीए व्ही. आणि समिया शाह यांनी 17-21, 21-19, 14-15 अशा फरकाने राजधानीच्या खेळाडूंना हरवत विजयी घोडदौड केली.


तिसऱ्या फेरीत राजधानीची आगेकूच

तिसऱ्या फेरीत राजधानीने पुन्हा आघाडी घेत विजय साकारला. राजधानीच्या रजनीश गुप्ता आणि सुनील सेठने शानदार खेळी करत प्रतिस्पर्धी संघाच्या प्रतीक सी आणि डाझशक जे यांना 15-21, 22-20, 15-13 ने पराभूत केले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा