Advertisement

वसई-विरार मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात


वसई-विरार मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात
SHARES

इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथाॅनचे अाठवे पर्व ९ डिसेंबर २०१८ रोजी रंगणार असून अाॅनलाईन प्रवेश नोंदणीला २४ अाॅगस्टपासून सुरुवात होणार अाहे. वसई-विरार मॅरेथाॅन शर्यत ही भारतीय अॅथलिट्ससाठी सर्वाधिक बक्षिस रकमेची एकमेव स्पर्धा म्हणून अोळखली जाते. यावर्षीही देशातील धावपटूंवर ४५ लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली जाणार अाहे. अॅथलेटिक्स फेडरेशन अाॅफ इंडियाने (एएफअाय) या स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा बहाल केला अाहे.


नव्या शर्यतीचा समावेश

वसई विरार मॅरेथाॅनमध्ये या वर्षी पहिल्यांदाच ५ किमी धावण्याच्या शर्यतीचा समावेश करण्यात अाला अाहे. पूर्ण मॅरेथाॅन (४२.१९५ किमी.), अर्ध मॅरेथाॅन (२१.०९७ किमी.) अाणि ११ किमी या तीन गटात ही स्पर्धा खेळविण्यात येणार अाहे. त्याचबरोबर काॅर्पोरेट टीम्ससाठी किंवा रनिंग ग्रूप मेंबर्ससाठी 'बॅटलरन’ हासुद्धा गट ठेवण्यात अाला अाहे.


इतकी असेल फी

पूर्ण मॅरेथाॅन, अर्ध मॅरेथाॅन अाणि ११ किमी. धावण्याच्या शर्यतीसाठी ७५० रुपये नोंदणी शुल्क असेल. तर ५ किमी धावण्याच्या शर्यतीसाठी हे शुल्क ७०० रुपये असेल. अाॅनलाइन नावनोंदणी करण्यासाठी www.ibvvmm.com या संकेतस्थळाला भेट द्या. स्पर्धेविषयीची अधिक माहिती 88795 59049 या अधिकृत क्रमांकावर उपलब्ध होईल.


हेही वाचा -

टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात

वसई-विरार मॅरेथॉनमध्ये 18 हजार धावपटू धावणारसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा