Advertisement

मुंबईचा एकही पंच नसल्याची खंत वाटते - माधव गोठोस्कर


मुंबईचा एकही पंच नसल्याची खंत वाटते - माधव गोठोस्कर
SHARES

भारतातील प्रसिद्ध माजी आंतरराष्ट्रीय पंच माधव गोठोस्कर, दारा पोचखानवाला, पिलू रिपोर्टर आणि एम. वाय. गुप्ते यांचा शनिवारी संध्याकाळी वानखेडे येथे सत्कार करण्यात आला. द असोसिएशन ऑफ क्रिकेट अंपायर ऑफ मुंबई (एसीयूएम) ला 35 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. एसीयूएमचे अध्यक्ष रवी सावंत यांच्याहस्ते मुंबईतल्या सर्व प्रसिद्ध पंचांचा सत्कार करण्यात आला.

यापूर्वी पंचांमध्ये मुंबईचे नाव होते. आता सर्व पंच हे पश्चिम भारतातील आहेत. मुंबईतले एकही पंच का नाहीत? अशी खंत माधव गोठोस्कर यांनी यावेळी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले 'मी पंच होणारच असे प्रत्येकाने मनापासून ठरवले पाहिजे. भविष्यात मी असेन किंवा नसेन, पण मुंबईचा एकतरी पंच हवा. आज 35 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे मला हा दिवस मोलाचा वाटतो. जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा या असोसिएशनचा वृक्ष एवढा मोठा होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. या असोसिएशनमुळे मी मोठा झालो असे म्हणत त्यांनी असोसिएशनचे कौतुक केले.

यावेळी दारा पाचखानवाला यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'मुंबईतले पहिले पंच म्हणून ओळखले जाणारे माधव गोठोस्कर यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा. त्यांचे मार्गदर्शन हे मोलाचे आहे', असे म्हणत पाचखानवाला यांनी गोठोस्करांचे कौतुक केले.



हेही वाचा -

एलबीडब्ल्यू आणि अंपायर...

भारत-पाकिस्तान सामन्याला फिक्सिंगपेक्षाही याचा धोका!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा