शेष भारताने इराणी चषक जिंकला

  Pali Hill
  शेष भारताने इराणी चषक जिंकला
  मुंबई  -  

  मुंबई - गुजरात आणि शेष भारत संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये झालेल्या इराणी चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी शेष भारत संघाने 6 गडी राखत गुजरातचा पराभव केला. गुजरातने शेष भारतला 379 धावाचं लक्ष्य दिलं होतं. मात्र अवघ्या 4 विकेटच्या मोबदल्यात शेष भारत संघाने विजय मिळवला. शेष भारतने 18 वेळा या स्पर्धेत सहभाग घेतला ज्यात 14 वेळा विजय मिळवला आहे.

  शेष भारतचा यष्टीरक्षक फलदांज ऋद्धिमान साहाने त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच दुहेरी शतक लगावले. यापूर्वी त्याने 178 धावा केल्या होत्या. पण या वेळी त्याने नाबाद 203 धावा करत एक नवीन रेकॉर्ड रचला. साहा व्यतिरिक्त कर्णधार चेतेश्वर पुजारा यानेही नाबाद 116 धावांची खेळी खेळली. या दोघांनी मिळून 316 धावांची भागीदारी केली.
  शेष भारत संघातल्या सिद्धार्थ कौल याने दोन्ही डावात 5 आणि 3 विकेट घेतल्या. 203 धावांचा नाबाद खेळी खेळत शेष भारताला विजय मिळवून देणारा ऋद्धिमान साहा मॅन ऑफ द मॅच ठरला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.