चर्चगेट - हॉकी असोसिएशनच्या महिंद्रा स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दक्षिण मध्य रेल्वेनं मध्य रेल्वेवर 6-3नं मात केली. प्रभतज्योती सिंगच्या दोन सणसणीत गोलमुळे इंडियन ऑइलनं पंजाब अँड सिंध बॅंक, दिल्लीवर 4-3नं मात करत बॉम्बे गोल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेची उपांत्य फेरी मंगळवारी इंडियन ऑइल विरुद्ध पंजाब नॅशनल बॅंक आणि दक्षिण मध्य रेल्वे विरुद्ध कॅग यांच्यात होणार आहे.