Advertisement

वाॅरियर्सने पँथर्सला हरवून जिंकले एमसीएफ टेटे लीगचे जेतेपद


वाॅरियर्सने पँथर्सला हरवून जिंकले एमसीएफ टेटे लीगचे जेतेपद
SHARES

अक्षय गोगारीच्या नेतृत्वाखालील रोअरिंग पँथर्स संघानं अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत डीएस वाॅरियर्सला ४-० अशी सहज धूळ चारत एमसीएफ प्रीमिअर टेबलटेनिस लीगचे जेतेपद पटकावले. मंडपेश्वर सिविक फाउंडेशनतर्फे त्यांच्याच स्पोर्टस काॅम्प्लेक्समध्ये अायोजित करण्यात अालेल्या या टेबलटेनिस लीगमध्ये रोअरिंग पँथर्सने साखळी फेरीत डीएस वाॅरियर्सकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा अंतिम फेरीत काढला.


शानदार सुरुवात

अक्षय गोगारीने या स्पर्धेत एकही सामन्यात हार पत्करली नाही. अंतिम लढतीत मात्र त्याच्याविनाच सहकाऱ्यांनी रोअरिंग पँथर्सला जेतेपद मिळवून दिले. पार्थ रांभियाने डीएस वाॅरियर्सच्या अशोक सावंत याला ११-३, ११-४ असे चारीमुंड्या चीत करत रोअरिंग पँथर्सला शानदार सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रमाेद लिमयेला राजू राजपालविरुद्ध संघर्ष करावा लागला. मात्र प्रमोदने हा सामना १०-११, ११-५, ११-४ असा जिंकत रोअरिंग पँथर्सला २-० अशी अाघाडी मिळवून दिली.


वाॅरियर्स पूर्णपणे निष्प्रभ

गटसाखळीत दुसऱ्या स्थानी मजल मारणाऱ्या अाणि अकिरा ड्रॅगनला हरवून फायनलमध्ये धडक मारणारा डीएस वाॅरियर्स संघ मात्र अंतिम फेरीत निष्प्रभ ठरला. तनिष सावंत याने रायन पाॅवर याच्यावर ११-१, ११-१ अशी सहज मात करत रोअरिंग पँथर्सची अाघाडी ३-० अशी वाढवली. स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यातही डीएस वाॅरियर्सची डाळ शिजली नाही. अखेर याग्निक पांचाळ-ख्रिस लुनिस यांनी वाॅरियर्सच्या कुणाल शाह-अश्विन त्रिवेदी यांना ११-१०, ११-७ असे हरवून जेतेपदावर मोहोर उमटवली.


हेही वाचा -

रोअरिंग पँथर्सची एमसीएफ टेबल टेनिस लीगच्या अंतिम फेरीत धडक

मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा