क्रिकेटचा देव झाला 44 वर्षांचा

 Mumbai
क्रिकेटचा देव झाला 44 वर्षांचा

आज देवाचा दिवस आहे. अहो देवाचा म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडूलकर नावाच्या क्रिकेटच्या देवाचा दिवस आहे. क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्ष अधिराज्य गाजवणारा क्रिकेटचा देव आज 44 वर्षांचा झाला आहे. देशात आणि देशाबाहेर सचिनचे लाखो-करोडो चाहते आहेत. सचिन म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की सचिन. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याला स्वप्नात दिसणाऱ्या या सचिनने आपल्या नावावर अनेक विक्रम कोरलेत.

सचिनने क्रिकेट रसिकांसह सगळ्यांनाच त्याच्या अफलातून फलंदाजीने वेडे केले आहे. जेव्हा सचिनने किक्रेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा सगळ्यात जास्त दु:ख त्याच्या चाहत्यांना झालं. सचिन आतापर्यंत भारतासाठी 400 हून अधिक एकदिवसीय सामने, 200 कसोटी सामने खेळला. एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा, तर कसोटी सामन्यामध्ये 15 हजार 921 धावा करुन सचिनने क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं आहे. या क्रिकेटच्या देवाला 'मुंबई लाइव्ह'कडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा

Loading Comments