Advertisement

सखी मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सखी मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
SHARES

घाटकोपर - प्रजापिता ब्रह्माकुमारी या संस्थेतर्फे घाटकोपरमध्ये चार किलोमीटरची सखी मॅरेथॉन रविवारी आयोजित केली होती. पंतनगर परिसरातल्या आचार्य अत्रे मैदानापासून सकाळी 7 वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये वर्षा भावरी हिने प्रथम क्रमांक, सोनिया वॉक्लने दुसरा तर माधुरी देशमुखने तिसरा क्रमांक पटकावला. या तिन्ही मुलींना कलर्सवरील 'कसम' मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शरद मल्होत्राच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.

सखी मॅरेथॉनमध्ये 250 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी सर्व महिलांना मेडिटेशन ट्रेनिंग देण्यात आले. तसेच खास ब्रेस्ट कॅन्सर निदान शिबीर, डोळे तपासणी आणि आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. बहुतांश महिला या नोकरी, घर आणि मुले अशी सर्व जावाबदारी सांभाळतात. या जवाबदाऱ्या सांभाळताना स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांसाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा