'सिक्स अ साईड' फुटबॉल रिंगचं उद् घाटन

 Dalmia Estate
'सिक्स अ साईड' फुटबॉल रिंगचं उद् घाटन
'सिक्स अ साईड' फुटबॉल रिंगचं उद् घाटन
See all
Dalmia Estate, Mumbai  -  

मुलुंड - प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये 'सिक्स अ साईड' फुटबॉल रिंग तयार करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या रिंगचं उद् घाटन करण्यात आलं. आदित्य ठाकरे येणार म्हणून शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली होती. रस्त्यावर दुतर्फा भगवे झेंडे आणि बॅनरबाजी करून आदित्य यांचं स्वागत करण्यात आलं. महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली असल्यामुळे आदित्य काही टिपणी वा मार्गदर्शन करतील, अशी शिवसैनिकांना अपेक्षा होती. पण निवडणुकीबद्दल अवाक्षरही न काढता आदित्य यांनी लोकार्पण सोहळा आवरता घेतला.

Loading Comments