Advertisement

सौरव गांगुली बनणार BCCI चा नवा अध्यक्ष?


सौरव गांगुली बनणार BCCI चा नवा अध्यक्ष?
SHARES

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा बॉस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळं त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

अध्यक्षपदावरून २ गट

बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदाच्या नावावरून २ गट पडले होते. माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापली नावं पुढं केली होती. या दोन्ही नावावरून अनेक चर्चा झाली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्वसहमती झाली. अध्यक्षपदासाठी गांगुलीचं नाव पुढं येण्याआधी या नावासाठी चर्चेत असलेल्या कर्नाटकटचे ब्रिजेश पटेल यांच्यावर आयपीएलचं निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाणार आहे.

अध्यक्षपदासाठी अर्ज

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. आसाम क्रिकेट असोसिएशनचे देवजीत सैकिया यांचे नाव सहसचिव पदासाठी चर्चेत आहे. त्याशिवाय, सौरव गांगुली अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची एटीव्हीएम तिकीट विक्रीला पसंती

मागील ५ वर्ष वेळ नव्हता का? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा